विधानसभा अधिवेशन : भाजपच्या या १२ आमदारांचे निलंबन
मुंबई :
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ उडाला . सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये तू मै झाले .या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं . त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय . भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले.
भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन ?
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे , माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आले आहे . यामध्ये आशिष शेलार , योगेश सागर , अभिमन्यू पवार , संजय कुटे , अतुल भातखळकर , पराग अळवणी , गिरीश महाजन , राम सातपुते , हरीश पिंपळे , नारायण कुचे , जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे . या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे . संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली .