बालिंगा येथे सामाजिक कार्यकर्ते आनंदराव जाधव यांच्यातर्फे शिबिराचे आयोजन
कोल्हापूर :
बालिंगा ( ता . करवीर ) येथे मोफत शिबिर पार पडले . राष्ट्रवादी ग्राहक सेल करवीरचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आनंदराव जाधव यांच्यातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले .
याशिबिराअंतर्गत दहावी व बारावी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक बाबींचा लाभ घेण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले व डोमेसाईल विनाशुल्क काढून देण्यात आले . निश्चितच यामुळे ऐनवेळी होणारी पालकांची धावपळ थांबणार आहे . बालिंगा गावाबरोबरच पंचक्रोशीतील जवळपास ११६ विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे व माजी शिक्षण सभापती रसिका अमर पाटील ( शिंगणापूरकर ) होते . यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य धनंजय ढेंगे , सदस्या विद्या माळी , सुनिता जांभळे , वैशाली कांबळे , सामाजिक कार्यकर्ते कृष्णात माळी , प्रकाश जांभळे , अजित कांबळे , अंजना माळी , राजू चौगले , संभाजी जांभळे , सचिन बुडके , विजय पोवार , विलास वागवेकर , मोहन कांबळे , राजू येळवडे , संदीप तांदळे , सत्यजित दळवी , अजय वाडकर , राजू सय्यद , राजू चव्हाण , युवराज वाडकर , अमर यादव , संदीप ढेंगे , रमेश वरुटे , संतोष बोधे , संजय वागवेकर , रोहित वागवेकर , उत्तम कांबळे , विश्वास जांभळे , विकास जांभळे आदी मान्यवर तसेच सर्व तरुण मंडळे व ग्रामस्थ उपस्थित होते .