कुंभी कासारी बँकेला १ कोटीचा नफा: अजित नरके (४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा)
करवीर :
कुंभी कासारी बँकेला संपलेल्या आर्थिक वर्षात एक कोटी चार लाख रुपये नफा झाला आहे. सभासद, खातेदारांबरोबर ,कर्मचारी ,संचालक.
मंडळाच्या सहकार्याने बँकेने ठेवींचा १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. यावर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश दिला असल्याचे अध्यक्ष अजित नरके यांनी यावेळी जाहीर केले. आतापर्यंत ठेवी बद्दल बँको,बँक असोसिएशन असे तीन पुरस्कार प्राप्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बँकेच्या मुख्य शाखेतील सभागृत ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अजित नरके बोलत होते. यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके,उपाध्यक्ष अरूण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यकारी अधिकारी डी.एस.राऊत यांनी विषय वाचन केले.
यावेळी अध्यक्ष अजित नरके म्हणाले ,
संचालक मंडळाचे सव्वाशे कोटी ठेवीचे उद्दिष्ट आहे. कर्जात साडे पंधरा टक्केने वाढ झाली आहे.
नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना कर्जावरील व्याजाचा २ टक्के प्रमाणे ५० लाख व्याज परतावा दिला आहे.थकबाकीचे प्रमाण यामुळे कमी झाले आहे.५ लाखाच्या आतील ८८ कोटीच्या ठेवींना विमा संरक्षण असून या सर्व ठेवी सुरक्षित आहेत. यामुळे बँक भक्कम पायावर उभी राहिली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निधीचे उद्दिष्ट ठेवण्याचे सांगण्यात आले.अडीच लाख एटीएम सेंटरवर बँकेच्या ग्राहकांनी डेबिट कार्ड वापरण्याची सुविधा दिली आहे. ग्राहक सभासदांनी डेबिट कार्ड वापराची सवय वाढवावी अशी मागणी केली.
यावेळी भीमराव नाळे सांगरूळ यांनी लाभांशात वाढ करा,जंगली प्राण्याच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत सभासद नातेवाईकांना मदत द्या,मयत कर्जदारांना विमा संरक्षण मिळावे असे सांगितले. यावेळी दत्ता पाटील (साबळेवाडी),सदाशिव शेलार(कुडित्रे)रामचंद्र मोरे(वाकरे)यांनी चर्चेत भाग घेतला. इतिवृत्त वाचन प्रविण पोतदार यांनी केले. यावेळी सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.