यशवंत सहकारी बँकेच्या भोगावती येथील शाखेचे
उदघाटन ( बँकेच्या १२ व्या शाखेचा
उत्साहात उदघाट्न समारंभ )
भोगावती :
भोगावती, शाहूनगर परिते (ता.करवीर) येथे
श्री. यशवंत सहकारी बँक मर्या. कुडित्रे (ता.करवीर) या बँकेच्या १२ व्या शाखेचा उदघाट्न सोहळा उत्साहात संप्पन्न झाला. गुडाळेश्वर पतसंस्थेचे संस्थापक, भोगावती साखर कारखान्याचे संचालक ए.डी.पाटील यांच्या शुभहस्ते शाखेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी यशवंत बॅकेचे चेअरमन एकनाथ पाटील म्हणाले, यशवंत बँकेने कुंभी कासारी परिसरात खातेदार,ठेवीदार यांना प्रमाणिकपणे सेवा देऊन विश्वासाहर्ता जपली आहे. बँकेची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे. भोगावती परिसरातील व्यापारी,ठेवीदार यांच्या आग्रहाखातर भोगावती येथे शाखा सुरू करत असून शाखेत ए.टी.एम.,मोबाईल बॅकिंग,फोन पे,गुगल पे ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे भोगावती परिसरातील ठेवीदार,कर्जदार यांनी यशवंत बँकेत व्यवहार करुन या शाखेचा नावलैकिक करावा असे आवाहन केले.
स्वागत यशवंत बँकेचे उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांनी केले. यावेळी भोगावतीचे संचालक डी.आय.पाटील, हिंदुराव चौगले, पांडुरंग पाटील, धिरज डोंगळे, गोकुळचे माजी संचालक उदय पाटील,परिते सरपंच मनोज पाटील, शिक्षक नेते बंडोपंत किरूळकर, बबन पाटील, पै. आनंदराव पाटील, बाजीराव खाडे, तुकाराम पाटील, उत्तम पाटील, संग्राम भापकर,नामदेव मोळे,प्रकाश पाटील, भगवान सूर्यवंशी, सर्जेराव पाटील, पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, आनंदराव पाटील, दादासाहेब पाटील, आनंदराव जांबिलकर,निवास पाटील, राजेंद्र पाटील,राजश्री भोगावकर, सुरेश अपराध, युवराज कांबळे, शाखाधिकारी उत्तम पाटील, संभाजी पाटील, आदी बॅकेचे कर्मचारी, भोगावती व परिसरातील व्यापारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांनी आभार मानले.