व्यवस्थापकिय संचालक मंडळ स्थापण्यासाठी ठराव मंजूर
करवीर :
कुंभी बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पुर्ण करताना व्यवसाय वृध्दीला प्राधान्य दिले आहे. एकूण कर्जाच्या २५ टक्के कर्जे शेती व शेती उद्योगाशी संलग्न व्यवसायासाठी दिली आहेत. बँकेच्या सर्व कर्जदारांनी कर्ज परतफेडीला केलेले सहकार्यामुळे बँकेला १०० कोटींंचा ढोबळ नफा झाल्याचे बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी सांगितले.

कुंभी कारखान्याच्या शेतकरी हॉलमध्ये झालेल्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजित नरके अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विषय वाचन कार्यकारी अधिकारी डी.एस. राऊत यांनी केले.
यावेळी अजित नरके म्हणाले सहकारी बँकासमोर मोठी स्पर्धा व रिझर्व्ह बँकेची बंधने असताना सभासद व कर्मचारी यांच्या सहकार्याने ८९ कोटींचा ठेवी संकलित केल्या आहेत. अहवाल वर्षात ४८ कोटींची कर्जे वाटप केले आहेत. बँकेने ७० लाख निव्वळ नफा मिळविला असून आँडिट वर्ग ‘अ’ राखण्यात यश मिळवले आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळ सारख्या कर्ज योजना जिल्ह्यात पहिल्यांदा राबवून ४ कोटींची कर्जे देऊन युवकांना आर्थिक सहकार्य केले आहे. या सर्व कर्ज प्रकरणांचे सुरळीत हप्ते आहेत.
यावेळी आर डी पाटील (पाडळीखुर्द),व भिमराव नाळे (सांगरूळ)यांनी अल्प, मध्यम व दिर्घ मुदतीच्या कर्जाच्या थकबाकीवर बोट ठेवले.या बाबत नरके म्हणाले ८५ टक्के थकबाकी ही एक वर्षाच्या आतील कर्ज प्रकरणाची आहे. ५ वर्षावरील कर्जाच्या थकबाकीचे प्रमाण केवळ ५ टक्के असल्याचे सांगितले. लाभांश तरतूद करण्याला रिझर्व्ह बँकेचा विरोध असून सुवर्ण मोहत्सव निधीत तरतूद करण्याचे नियोजन आहे. असे सांगितले.
यावेळी रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या ठरावावर मोठी चर्चा झाली. कुंभी कासारी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी या संचालक मंडळाचा चांगला फायदा आहे. त्यांच्या चांगल्या सुचनांचे पालन करून कारभार होईल.यामुळे हे संचालक मंडळ घेण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. चर्चेत कुंडलिक पाटील (आमशी),बळी व्हरांबळे (यवलूज) यांनी भाग घेतला. आभार अरुण पाटील यांनी मानले.