ग्राम ग्रामस्तरीय, प्रभाग ग्रामस्तरीय ७ दिवस संस्थात्मक अलगीकरण
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूर :

जिल्हयाबाहेरून कोल्हापूर मध्ये तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वास्तव्यास येणाऱ्या किंवा कोल्हापूर जिल्हयातील एका गावातून दुसऱ्या गावात तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वास्तव्यास येणाऱ्या सर्व व्यक्तींनी जिल्हयामध्ये प्रवेश किंवा एका गावातून दूसऱ्या गावामध्ये प्रवेश करणेपूर्वी 48 तासामध्ये कोव्हीड-19 विषाणू चाचणीची RTPCR किंवा  Antigen Test केल्याचे व अशी तपासणी –Ve (नकारात्मक) असल्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात येत आहे. एखादी व्यक्ती जिल्हयाबाहेरून कोल्हापूर मध्ये किंवा जिल्हयातंर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये परस्पर वास्तव्यास गेल्यास प्रभाग समिती / ग्राम समिती निश्चित करील त्याप्रमाणे अशा व्यक्तीस किमान 7 दिवस गृह अलगीकरण किंवा ग्रामस्तरीय किंवा प्रभागस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक असेल, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

राज्यात व कोल्हापूर जिल्हयामध्ये कोव्हीड -19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोव्हीड -19 संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता विचारात घेता, कोव्हीड -19 विषाणूचा फैलाव रोखणेसाठी आणि तातडीच्या उपाययोजना करणेसाठी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाकडील आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
कोव्हीड -19 दुसऱ्या लाटेचा विचार करता, ग्राम समित्या व प्रभाग समित्या नव्याने कार्यान्वित करणे आवश्यक आहे. समितीच्या मार्फत स्थानिक पातळीवर परदेश / परराज्य / परजिल्हा/ परगांवे येथून येणाऱ्या नागरिकांचे अलगीकरण, कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून करणे आवश्यक आहे.

कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीजवळ असे कोव्हीड -19 संसर्ग तपासणीचे नकारात्मक प्रमाणपत्र नसल्यास अशा व्यक्तीने, ते ज्या तालुक्यामध्ये जाणार आहेत, तेथील तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात किंवा तपासणी सुविधा उपलब्ध असलेल्या कोणत्याही शासकीय किंवा खाजगी प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रथम स्वॅब देणे बंधनकारक करणेत येत आहे. तपासणीचा नकारात्मक अहवाल येईपर्यत अशा व्यक्तीस ग्राम समिती / प्रभाग समितीच्या सल्ल्याने गृह किंवा ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात राहावे लागेल.

एखादी व्यक्ती कोल्हापूर जिल्हयाबाहेरून कोल्हापूर मध्ये किंवा जिल्हयातंर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये परस्पर वास्तव्यास गेल्यास प्रभाग समिती / ग्राम समिती निश्चित करील त्याप्रमाणे अशा व्यक्तीस किमान 7 दिवस गृह अलगीकरण किंवा ग्रामस्तरीय किंवा प्रभागस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.
कोल्हापूर जिल्हयामध्ये इतर जिल्हयातून येणाऱ्या किंवा जिल्हयातंर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये परस्पर वास्तव्यास येणाऱ्या व्यक्तींने कोव्हीड -19 संसर्ग तपासणी प्रवेशापुर्वी केली नसल्यास, प्रवेश केल्यानंतर अलगीकरणात असताना 3 दिवसांनी RTPCR किंवा Antigen तपासणी करून नकारात्मक अहवाल आल्यास पुढील 4 दिवसांचे अलगीकरणातून सूट दिली जाईल.
कोल्हापूर जिल्हयामध्ये इतर जिल्हयातून येणाऱ्या किंवा जिल्हयातंर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तीस प्रवेश देणे किंवा गृह किंवा ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात ठेवणे, याबाबत ग्रामसमिती / प्रभाग समितीचा निर्णय अंतिम असेल.
आदेशाची त्वरित अमंलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील याची नोंद घेणेत यावी, असा इशाराही आदेशात दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!