१२ वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी, १० वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून
मुंबई :
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून परीक्षेची घोषणा केली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी अर्थात २०२२ साली १२ वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे.
लेखी परीक्षा किती काळ चालणार..
ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण १०-वी आणि १२ वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होईल”, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
Prof. Varsha Eknath Gaikwad
@VarshaEGaikwad
·
Dec 16, 2021
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.
SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR
Prof. Varsha Eknath Gaikwad
@VarshaEGaikwad
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
5:44 PM · Dec 16, 2021 from Mumbai, India
388
Reply
Copy link to Tweet
सर्व परीक्षा करोना नियमांचं पालन करूनच पार पडतील, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.