गोकुळ’ सहकारातील अग्रणी दूध संघ : रणजितसिंह देशमुख ( ‘महानंद’च्या संचालक मंडळाची ‘गोकुळ’ ला भेट)
कोल्हापूर (ता.२३):
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या.,मुंबई (महानंद) यांनी दिनांक २३/१०/२०२१ इ.रोजी चेअरमन, संचालक मंडळ व अधिकारी यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख म्हणाले कि कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ(गोकुळ) ने दुग्ध व्यवसायात क्रांती करून ग्रामीण जीवनमान उंचावलेले आहे.लाखो दूध उत्पादक,संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्ररिश्रमातुन गोकुळने महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय यशस्वी केलेला आहे. गोकुळ दूध संघाच्या विविध योजनामुळे दूध वाढीसाठी उत्पादकांना प्रोत्साहन मिळत आहे. यामुळेच गोकुळ हा महाराष्ट्रातील सहकारामधील अग्रणी दूध संघ आहे व महाराष्ट्रातील खाजगी संघाना व परराज्यातील अमुल सारख्या दूध संघाना टक्कर देण्यासाठी गोकुळने पुढाकर घ्यावा. तसेच गोकुळने महानंद व राज्यातील इतर सहकारी संघाना मार्गदर्शन करण्याची भुमीका गोकुळने घेणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी व संचालक मंडळाने गोकुळ दूध संघास भेटी वेळी केले.
महानंदचे व्हा.चेअरमन डी.के. पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे भोगोलीक वातावरण हे दूध उत्पादनासाठी पोषक व पुरक असुन कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना गोकुळ मुळेचे अर्थिक स्थैंर्य मिळाले आहे. गोकुळचे कार्य व व्यवस्थापन बघून भारावून गेलो असे मनोगत व्यक्त केले.
महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख व पदाधिकाऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले. आणि आभार माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनी मानले.
यावेळी महानंदचे संचालक विनायक पाटील, सुभाष निकम, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर,बाळासो खाडे, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महानंदचे कार्यकारी संचालक शामसुंदर पाटील महानंदचे डॉ. दिनेश सावंत, आर.के.पाटील, भावेश पाटील, रमेश ढवळे, दोन्ही संघाचे अधिकारी उपस्थित होते.