भरती जीडी कॉन्स्टेबल परीक्षा : पुरुष कॉन्स्टेबलची २२४२४ पदे, आणि महिला कॉन्स्टेबलची २८४७ पदे
Tim Global :
एसएससी, जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षा २०२१ ही १६ नोव्हेंबर २०२१ ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान देशातील विविध शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. या भरती परीक्षेद्वारे CAPFs, NIA, SSA आणि Rifleman (GD) मध्ये कॉन्स्टेबल (GD) च्या एकूण २५२७१ पदांची भरती केली जाणार आहे.
यामध्ये पुरुष कॉन्स्टेबलची २२४२४ पदे, आणि महिला कॉन्स्टेबलची २८४७ पदे आहेत. BSF मध्ये ७५४५, CISF मध्ये ८४६४ , SSB मध्ये ३८०६ ३८०६, ITBP मध्ये १४३१ , AR मध्ये ३७८५ आणि SSF मध्ये २४० जागा रिक्त आहेत.
कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र या महिन्याच्या शेवटी,अथवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला जारी केले जाऊ शकते. एसएससी जीडी कॉन्स्टेबल भर्ती प्रवेशपत्रे २० ऑक्टोबर २०२१ नंतर कधीही जारी केली जाऊ शकतात.
जीडी कॉन्स्टेबल परीक्षेचे प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर उमेदवार आयोगाच्या वेबसाइट ssc.nic.in ला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतील.
लेखी परीक्षा संगणक आधारित असेल. यशस्वी उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी) आणि शारीरिक मापन चाचणी (पीएसटी) साठी बोलवले जाईल. लेखी परीक्षेत, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता, प्राथमिक गणित आणि इंग्रजी/हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील. चारही विभागातून २५-२५ प्रश्न विचारले जातील. सर्व विभाग प्रत्येकी २५ गुणांचे असतील. पेपरचा कालावधी ९० मिनिटांचा असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी चौथा गुण कापला जाईल.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी…. निकष
पुरुष उमेदवारांना २४ मिनिटांत ५ किमी चालवावे लागेल. आणि १.६ किमी साडेसहा मिनिटातही पळावे लागेल. महिला उमेदवारांना ४ मिनिटात ८०० मीटर धावणे आवश्यक आहे. याशिवाय १.६ किमीची धाव देखील साडेआठ मिनिटांत करावी लागेल.