भरती साधा संधी : भारतीय डाक विभागात
नोकरी
Tim Global :
भारतीय डाक विभागाच्या दिल्ली सर्कलमध्ये तब्बल २२१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पोस्टल असिस्टंट, पोस्टमन आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांची भरती असून, या पदांसाठी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी कोणतीही लेखी परिक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड ही मेरिटच्या आधारे होणार आहे.
दहावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होईल. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर असून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
पोस्टल असिस्टंटचे ७२, पोस्टमनसाठी ९० आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी ५९ पदांचा समावेश आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट आणि पोस्टमन या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १२ वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवाराने १० वी उत्तीर्ण , उमेदवाराचं वय १८ वर्षे ते २७ वर्षे, मल्टी टास्किंग स्टाफसाठी वय १८ वर्षे ते २५ वर्षे दरम्यान पाहिजे. उमेदवारांनी माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेली अधिसूचना पाहण्याचं आवाहन करण्यात आले आहे