अग्निपथ योजनेअंतर्गत “अग्निवीरवायू”  पदाकरिता भरती
इच्छुकांनी 23 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत
                      -संजय माळी

कोल्हापूर : 

भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत “अग्निवीरवायू”  पदाकरिता 17 ½  ते  21 वर्षाच्या आतील नोकरी इच्छुक अविवाहित मुले, मुलींकरिता पदभरती होणार आहे. इच्छुक मुला-मुलींनी https://agnipathvayu.cdac.in  या संकेत स्थळावर दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

अर्ज करण्याकरिता आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक अहर्ता, वेतन  तसेच नियम व  अटीबाबत सविस्तर माहिती https://agnipathvayu.cdac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!