अंगावर वीज पडून शेतकरी ठार , या तालुक्यातील घटना
कोल्हापूर :

शाहूवाडी तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने सुरवात केली.
यावेळी गवताच्या गंजी झाकत असताना अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाला. बापूराव बापू जाधव ( वय ६१ ) रेठरे ( ता . शाहूवाडी ) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
रेठरे येथे शेतकरी बापूराव जाधव यांनी जनावरासाठी घराच्यामागे गवताची गंजी रचून ठेवली होती. आज पावसाने सुरवात केल्याने गंजी भिजू नये म्हणून प्लॅस्टिक कागद ते गंजीवर झाकत होते. यावेळी वीज कडाडली आणि बापूराव
यांच्या अंगावर पडली, यामध्ये ते जागीच ठार झाले. ही घटना ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी जाधव यांच्या घराकडे धाव घेतली .
या घटनेची माहीती शाहुवाडी पोलीस ठाणे व महसुल विभागाला देण्यात आली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. वैधकीय अधिकारी यांनी रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बापूराव जाधव यांच्या पाश्यात पत्नी, मुलगी असा परिवार आहे .