17 व 18 जून रोजी ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन


  
कोल्हापूर :

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ऑनलाईन जॉब फेअरचे 17 व 18 जून 2021 रोजी आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी दिली.

यामध्ये ट्रेनी वर्कर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, मॅनेजर, एच आर मॅनेजर, मशिन शॉप, लेथ ऑपरेटर, विमा सल्लागार, टेलीकॉलर, एसएफओ, बीओएम, आयटीआय सीएनसी, डिप्लोमा, मॅकॅनिकल इंजिनिअर, अशा 8 वी ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई. मॅकॅनिकल अशा शैक्षणिक पात्रतेची जिल्हयातील नामांकित 9 आस्थापनांची 227 विविध रिक्तपदांद्वारे मोठी संधी देऊ केली आहे.

हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे त्यामुळे जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन कोरोनाच्या प्रादूभार्वामुळे शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.

    इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार  18 जून 2021 रोजी त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएसद्वारे उद्योजकांकडून कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

       इच्छुक युवक- युवतींनी दि. 18 जून पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0231-2545677 वर संपर्क साधावा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!