राष्ट्रवादी’ तर्फे पूरग्रस्तांसाठी अडीच कोटीची औषधे
ए. वाय. पाटील : पाडळी खुर्द येथे वैद्यकीय मदत व औषधोपचाराचे वाटप
कोल्हापूर :
महापूरामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले असून अशा संकटाच्या काळात पूरग्रस्तांना आधार देण्याचे काम राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच मुंबई, पुणे, बारामती येथून मोठी मदत कोल्हापूरात आली असून अडीच कोटीची औषधे उपलब्ध करुन दिल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत व औषधोपचार वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे होते. अनिल साळोखे म्हणाले, आपत्तीच्या काळात सामान्य माणसाला पुन्हा उभे करण्याची शिकवण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे, त्यानुसारच पूरग्रस्तांना विविध प्रकारची मदत दिली जात आहे. राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील पाटील यांनी स्वागत केले. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई, सहकार सेलचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा डॉक्टरचे सेलचे डॉ. विक्रांत आरळेकर, पाडळीच्या उपसरपंच सुवर्णा पाटील, बालिंगेचे सरपंच मयुर जांभळे, रंगराव कोळी, शिवाजी पाटील, विकास माने, वैशाली पाटील, युवराज व्हरांबळे, संभाजी आडनाईक, बबन मुल्लाणी, युवराज पाटील आदी उपस्थित होते. जी. डी. पाटील यांनी आभार मानले.