कुंभी कासारी कोविड सेंटर येथे यशवंत सहकारी बँके मार्फत औषधे वाटप
करवीर :
कुंभी कासारी कोविड सेंटर येथे
यशवंत सहकारी बँके मार्फत कोविड रुग्णांना ३५ हजार रकमेची औषधे वाटप करण्यात आली. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले,परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, यामुळे कुंभी कासारी कोविड सेंटर येथे रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तसेच याठिकाणी औषधांचा तुटवटा जाणवू लागला आहे .यामुळे
कुंभी कासारी कोविड सेंटर येथे
यशवंत सहकारी बँक मार्फत कोविड रुग्णांना ३५ हजार रकमेची औषधे वाटप करण्यात आली. अशी माहिती यावेळी सांगण्यात आली.
यावेळी संचालक सुभाष पाटील, सर्जेराव पाटील, संग्राम भापकर, एस के पाटील, उत्तम पाटील, निवास पाटील, दादा पाटील, प्रकाश पाटील ,डॉ.अजित पाटील, दिलीप पाटील, प्रितमसिंह पाटील उपस्थित होते.