आदेश : सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना 1 जूनपर्यंत मुदतवाढ
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोल्हापूर :
जिल्ह्यात देण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 15 मे 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पासून ते दिनांक 1 जून 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
शासनाकडील आदेशानुसार दिनांक 15/05/2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पासून ते दिनांक 01/06/2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पर्यंत खाली दिलेल्या अतिरिक्त निर्बंधांचा समावेश करणेत आला आहे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करणेच्या वेळेच्या 48 तास अगोदर देणेत आलेली RTPCR –Ve चाचणी असलेला अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करणेत येत आहे.
- महाराष्ट्र शासनाकडील दिनांक 18/04/2021 आणि दिनांक 01/05/2021 रोजी देणेत आलेल्या आदेशानूसार कोविड संसर्गीत असलेल्या राज्य आणि ठिकाणावरून येणाऱ्या नागरिकांसाठी निश्चित करणेत आलेले निर्बध हे सद्यपरिस्थितीत भारतातील कोणत्याही राज्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना जसेच्या तसे लागू राहतील.
- माल वाहतुक करणाऱ्या वाहनामधून 2 पेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना ( चालक + क्लिनर / हेल्पर) प्रवास करणेस परवानगी राहील. जर असे माल वाहतुक करणारी वाहने बाहरेच्या राज्यामधून येत असतील, तर अशा वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करणेच्या वेळेच्या 48 तास अगोदर देणेत आलेली RTPCR –Ve चाचणी असलेला अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करणेत येत आहे. सदर अहवाल हा 7 दिवसापर्यत वैध असेल.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.