प्रोत्साहनपर अनुदानातून बँकेत ठेव ठेवण्याची सक्ती नको : भाजप किसान मोर्चाच्या वतीने निवेदन
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनेक शेतकऱ्याचे प्रोत्साहनपर अनुदान 50 हजार शेतकरी बांधवाचे जमा होत आहेत. पण बँकेकडुन काही शाखेमध्ये या अनुदानातील ठेव ठेवण्याची सक्ती करत असलेले निदर्शनास आले यासंबंधी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या वतीने अशा कोणत्याही प्रकारची सक्ती करु नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बँकेचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री. भगवान काटे, जिल्हा सरचिटणीस मा.श्री. सतिश पाटील, जिल्हा सरचिटणीस मा.श्री. नाना जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. दादासाहेब देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. युवराज पाटील, कार्यकारणी सदस्य मा.श्री. नामदेव साळोखे व कार्येकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.