गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन…

कोल्‍हापूर :

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १४७ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी), व संचालकसो यांच्‍या उपस्थितीत राजर्षी छ.शाहू महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करण्‍यात आले.

      यावेळी बोलताना श्री. पाटील म्‍हणाले सामाजिक सुधारणांबरोबरच राजर्षी शाहू महाराज यांनी शेती व उद्योगधंदयांना प्रोत्साहन दिले, अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली, कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला, महाराजांनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात कायापालट करणारा उपक्रम ठरला. शेतीविषयक धोरणे राबवून त्यांनी कोल्हापुर सुजलाम्‌-सुफलाम्‌ केले. महाराज हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्‍तंभ होते. महाराजांनी घेतलेले अनेक क्रांतिकारक निर्णय व कल्याणकारी हुकूम आजही समाजाला मार्गदर्शक आहेत.

यावेळी संघाचे पशुसंवर्धन विभागाचे सहा. व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश दळवी यांनी प्रास्‍तावीक व संचालकाचे स्‍वागत केले व आभार संकलनचे सहा. व्‍यवस्‍थापक डी.डी. पाटील यांनी मानले.

      यावेळी गोकुळचे चेअरमन श्री. विश्‍वास पाटील (आबाजी) माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक श्री.अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील (एस.आर.), प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो उर्फ वसंत खाडे,अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, व्‍यवस्‍थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्‍ही.मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुंरबेकर संघाचे अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!