पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरळे येथे मोफत आरोग्य तपासणीस प्रतिसाद
शिरोली दुमाला : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत आरळे (ता.करवीर ) येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. शिबिरात महिला व पुरुष असे एकूण १७० जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी जाधव यांनी केले.तपासणी कार्यात डॉ.इंद्रजित पाटील, डॉ. वर्षा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराचे उदघाटन जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शालेय विज्ञान स्पर्धेतून दिल्ली येथील स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल कु. ज्ञानेश्वर शशिकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक डॉ. आनंदा गुरव, जिल्हा चिटणीस अनिल देसाई, सरपंच ईश्वरा कांबळे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार, दादासो देसाई, अमित कांबळे ग्रामपंचायत सदस्य ग्रा.प. सदस्य तातोबा पाटील, चंद्रकांत नाईक, अतुल कदम, पवित्रा जाधव, यांच्यासह अजित चव्हाण, विकास पाटील, सुनील परीट, एकनाथ तोडकर, सुनील गुरव, सर्जेराव जाधव, भाऊसो जाधव, सुरेश जाधव, सतिश, जाधव, एकनाथ पाटील, सागर पाटील, संतोष जाधव, अरविंद जाधव, बळीराम भोसले, संदीप कळेकर, नंदकुमार म्हातुगडे आदी उपस्थित होते.