आरळे येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता जागृती कार्यक्रम संपन्न : ग्रामपंचायत आणि केडीसीसी बँकेच्या वतीने आयोजन
करवीर :
करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथे ग्रामपंचायत आणि केडीसीसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी आर्थिक व डिजिटल साक्षरता जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी
केडीसीसी बँकेचे एफ.एल.सी. करवीर विभाग प्रमुख राणोजी चव्हाण, लोकनियुक्त सरपंच वैशाली युवराज भोगम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी केडीसीसी बँकेचे एफ.एल.सी. करवीर विभाग प्रमुख राणोजी चव्हाण म्हणाले, महिलांनी बँकेचे डिजिटल व्यवहार हाताळले पाहिजेत. बँकेच्या विविध योजनांचा महिला बचत गटांनी लाभ घेऊन आर्थिक सक्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. नाबार्ड – जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरता, उद्योग उभारणीसाठी महिला बचत गटांसाठी विविध योजना सुरू आहेत. यां सर्व योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत चव्हाण यांनी नाबार्ड व जिल्हा बँकेच्या विविध योजनांची माहीती दिली.
डॉ. लखन भोगम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास चाफोडी बँक शाखाधिकारी दिनकर भिसे, युवराज भोगम, अर्चना चव्हाण, जयश्री देसाई, वैशाली देसाई, लक्ष्मी कदम, मधुकर पाटील, कृष्णात सुतार, बबलू काशीद यांच्यासह गावातील सर्व बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार संजय देसाई यांनी मानले.