अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीत शाहू छत्रपती महाराजांनी भरला उमेदवारी अर्ज :  शाहू महाराजांच्या विजयाचा जयघोष, जनतेचा प्रचंड उत्साह, संभाजीराजे व मालोजीराजे छत्रपती रॅलीत चालत 

कोल्हापूर : 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार  शाहू छत्रपती महाराज यांचा  उमेदवारी अर्ज आज मंगळवारी (दि.१६) अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीत, जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्तीप्रदर्शनाने दाखल करण्यात आला. दसरा चौकात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह होता. 

 रॅलीत शाहू छत्रपती महाराजांनी उपस्थित जनसमुदायाला हात उंचावून अभिवादन करताच कोल्हापूर आवाज शाहू महाराज शाहू महाराज, कोल्हापूर अस्मिता शाहू महाराज शाहू महाराज, कोल्हापूरचा समतेचा विचार शाहू महाराज शाहू महाराज, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज शाहू महाराज, आमचं ठरलंय शाहू महाराज, शाहू महाराज की जय आदी घोषणानी परिसर दणाणत होता. छत्रपती शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज  भरण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासूनच जिल्ह्यातून कार्यकर्ते यायला सुरुवात होत होती. महिलांचा सहभागही विशेष होता. कुस्तीपट्टू फेटे बांधून सहभागी झाले होते. धनगरी ढोलांचा, हालगी ताशांचा आवाज घुमत होता. 

जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी , जनतेची प्रचंड आणि उत्स्फूर्त गर्दीच महाराजांचा विजय निश्चित असल्याचा संकेत देत असल्याची खात्री दिली.

यावेळी  श्रीमंत याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणी साहेब ,संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती,  संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती , यशराजराजे छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार  सतेज  पाटील , आमदार पी. एन. पाटील , सरोज (माई) पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, संजयबाबा घाटगे, विजय देवणे, संजय पवार, व्ही.बी. पाटील, ए.वाय. पाटील, आर. के. पोवार, माजी जि प अध्यक्ष राहुल पाटील, कॉ. दिलीप पवार, नंदाताई बाभूळकर, सुनील शिंत्रे, आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अप्पी पाटील, गोपाळराव पाटील, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, सचिन चव्हाण, राजू लाटकर, डी. जी. भास्कर यांचेसह जिल्ह्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—————————————————————–

छत्रपती परिवार रॅलीत चालत  : 

शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय अशी चालत रॅली काढून अर्ज भरण्यात आला. मालोजीराजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांनी आलेल्या कार्यकर्त्यासमवेत तर संयोगिताराजे छत्रपती यांनी महिलांसमवेत चालत येत सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह व जोश वाढत होता. 

—————————————————————–

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!