पूर : महे – बीड पूलावर पुराचे पाणी,
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अद्याप कोठेही पुराचे पाणी आलेले नाही
कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील
महे – बीड पूलावर रात्री ११.३० पुराचे पाणी आले.

फोटो, स्वरूप पाटील महे,
यामुळे आज रस्ता वाहतुकीस बंद होईल.
रात्री ११.३० रस्त्यावर सुमारे एक फूट पुराचे पाणी आले आहे.आज पावसाची संततधार सुरू आहे,

फोटो, महेश पाटील महे,
आज रस्त्यावर असलेले पुराचे पाणी,आज पुन्हा पाणी वाढत आहे असे चित्र आहे.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर किरवे येथे
आज बुधवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 6 वा. म्हसोबा मंदिर, किरवे, कोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्ता या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या अंदाजे 5 फूट खाली पाणी आहे.

रात्रभर पाणीपातळी स्थिर आहे वाढ नाही,
अशी माहिती पोलीस पाटील प्रशांत पाटील किरवे यांनी दिली.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान अध्याप रस्त्याच्या खाली दहा ते बारा फूट पाणी आहे.

सकाळी 7 वाजताची पाणी स्थिती अशी आहे.