कै.शंकरराव पाटील कौलवकरांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन : विविध कार्यक्रम
राधानगरी :
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे व जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै.शंकरराव पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर , भोगावती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन उदयसिंह पाटील कौलवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमापूजन व विधवा स्त्रियांना साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर म्हणाले, कै. शंकरराव पाटील कौलवकर ,श्रीपतराव बोन्द्रेदादा यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविला आणि रुजविला.त्यामुळेच जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थेत सत्ताकेंद्रे तयार करता आली.
त्यांचे कार्य काँग्रेस पक्ष कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन केले.
स्वागत व प्रास्ताविक काँग्रेसचे राधानगरी विधानसभा मतदार संघाचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांनी केले. यावेळी संजयसिंह पाटील, भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील कौलवकर, ,सदाशिवराव चरापले,संचालक विश्वनाथ पाटील, धीरज डोंगळे, संजय कलिकते, शिवाजीराव पाटील,
बंडोपंत किरुळकर, अशोक पाटोळे, ए.के.चौगले, गोरे गुरुजी ,वसंतराव पाटील कंथेवाडी, संजयसिह कलिकते, वसंतराव पाटील, शिवाजीराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. मारुती जाधव, हिंदुराव चौगले, शिवाजी कारंडे, अमर पाटील, के. द. पाटील, विजय पाटील, रणजितसिह पाटील, शहाजी कवडे, बंडोपंत किरुळकर गुरुजी,दिगंबर येरूडकर ,सरपंच सविता चरापले, वृषाली पाटोळे आदी उपस्थित होते.