शेतक-यांसाठी : पूरबाधीत ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊस नोंदीच्या व बाधीत क्षेत्राच्या तपशीलासह कारखान्याकडे संपर्क शेतक-यांसाठी : पूरबाधीत ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊस नोंदीच्या व बाधीत क्षेत्राच्या तपशीलासह कारखान्याकडे संपर्क करावाकरावा

कोल्हापूर :

जिल्हयातील पूरबाधीत ऊस उत्पादक शेतक-यांनी आपल्या क्षेत्रातील ऊस ज्या कारखान्यांकडे नोंद केला आहे, अशा ऊसाचे प्राधान्याने गाळप होण्यासाठी कारखान्यांशी केलेल्या ऊस नोंदीच्या व बाधीत क्षेत्राच्या तपशीलासह संबंधित कारखान्याकडे संपर्क करावा. पूरबाधीत क्षेत्रातील ऊस गाळप संदर्भात काही अडचणी/ तक्रार निर्माण झाल्यास संबंधित कारखान्याचे कार्यकारी संचालक किंवा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे अवाहन प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचा सन 2021-22 चा गळीत हंगाम दिनांक 15 आक्टोबर 2021 नंतर सुरु करणेस मंत्री समितीच्या दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सभेत निर्णय झाला आहे. त्यास अनुसरुन कोल्हापूर जिल्हयातील साखर कारखाने दिनांक 15 आक्टोबर 2021 नंतर सुरु होत आहेत.

जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील ऊस क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पूरबाधीत क्षेत्रातील ऊसाचे प्रथम प्राधान्याने गाळप न केल्यास ऊस उत्पादक शेतक-यांचे आणखी नुकसान होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील पूरबाधीत क्षेत्रातील ऊसाचे हंगामाच्या सुरुवातीस प्रथम प्राधान्याने गाळप करण्याबाबत सर्व साखर कारखान्यांना सुचित करण्यात आले असून आवश्यकतेनुसार ऊस तोडणी यंत्राची उपलब्धता करुन घेणे व त्याप्रमाणे पूरबाधीत क्षेत्रातील ऊस गाळपाचे नियोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!