राधानगरी : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या : तालुका काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी
राधानगरी :
अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे राधानगरी तालुक्यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या घराची पडझड झाली तर काहींना आपला जीव गमावावा लागला.अतिवृष्टी मुळे अनेक गावातील वाडी वस्तीवरील घरांतील प्रापंचिक साहित्याचे नुकसान मोठे झाले आहे.म्हासुर्ली परिसरात घराच्या पडझडीने दोघांना जीव गमवावा लागला तर चार दुभती जनावरे मृत झाली आहेत. आहेत.नदी काठावरील ऊस,भात, नाचणी,सोयाबीन, जोंधळा केळी ,पिकाचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले व तालुका समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांनी तहसीलदार मीना निंबाळकर यांना दिले.
यावेळी विजयसिंह मोरे, सदाशिव चरापले,युवक तालुकाध्यक्ष वैभव तहसीलदार, संजयसिंह पाटील,रमेश पाटील – बचाटे, प. स. सदस्य उत्तम पाटील आदी उपस्थित होते.