करवीर :
खुपीरे येथील ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या वीस वर्षाचा रुग्णवाहिका प्रश्न प्रलंबित होता. कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. यामुळे नागरिक व रुग्णांची गैरसोय पाहून, जनतेच्या मगणीनुसार या ठिकाणी रुग्णवाहिकेसाठी २० लाखाचा निधी मंजूर करून घेतला. सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करावे,असे आवाहनही आमदार पी.एन.पाटील यांनी केले.
खुपिरे ता.करवीर येथे ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत आमदार पी.एन.पाटील यांच्या फंडातून खुपीरे ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रूपाली जांभळे होत्या.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, खुपिरेसह करवीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोना काळात जनतेला जलद आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी मतदारसंघात दोन ठिकाणी रुग्णवाहिका दिल्या आहेत. कोरानाचे रुग्ण वाढत आहेत, सर्वांनी स्वतः सह कुटूंबाची काळजी घ्यावी, सरकार जनतेच्या पाठीशी आहे.
यावेळी कुंभी करखाण्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी गावामध्ये पेजल योजनेचे काम जनतेच्या विश्वासास पात्र राहून पूर्ण करून पूर्ण क्षमतेने पाणी आम्ही देणार आहोत. आणि या कामाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन घेणार आहोत असे सांगितले.
यावेळी कुंभी कारखाना माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील, माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील यांचे मनोगत झाले. यावेळी सरदार बंगे व माजी सरपंच प्रकाश चौगले, जिल्हा शल्यचिकित्सक ए.डी.माळी, वैद्यकीय अधीक्षक एस ,बी, थोरात , हिंदुराव पाटील ,सनी पाटील उपसरपंच युवराज पाटील, रणजीत पाटील, प्रवीण पाटील ,तानाजी गवळी, हिंदुराव माळवले , पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.