सामाजिक : शिंगणापूर जिल्हा परिषदमधील गावांतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिकेची सोय
करवीर :
शिंगणापूर. ता. करवीर येथील
उत्तम ,अमृतची जोडी जिल्हा परिषद मतदार संघातील कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. राजकारणाबरोबर समाजकारणाचा वसा घेतलेल्या अयोध्या डेव्हलपर्सचे मालक व्ही. बी. पाटील शिंगणापूरकर
यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुतणे उत्तम पांडूरंग पाटील व अमृत उर्फ अमर पांडूरंग पाटील यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
या दोन पाटील बंधूंनी आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेऊन ज्या कोरोना आजाराच नाव जरी घेतलं तर अंगावर शहारे येतात, त्या कोरोणा रुग्णांच्या सेवेसाठी अम्ब्युलन्स सोय केली आहे.
शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातून प्रथमच जनसेवेच्या आधारावर अपक्ष निवडून आलेल्या अमृत उर्फ अमर पाटील यांच्या पत्नी रसिका अमर पाटील या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. आतापर्यंत मतदारसंघात केलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यांच्यामागे असलेला जनाधाराची दखल घेऊन पाटील कुटुंबीयांनी आपल्या मतदारसंघ कोरोनामुक्त व्हावा यासाठी मतदार संघातील कोणत्याही गावात कोरोना पॉजिटिव्ह पेशंट सापडल्यास त्या रुग्णास पुढील उपचारांसाठी दवाखाना येथे जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
गावातील कोणताही वाहन चालक तयार होत नाहीत. त्यामध्ये बराच कालावधी होऊन पेशंट दगावन्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पाटील कुटुंबियांनी शिंगणापूर मतदार संघातील सर्व लोकांची काळजी घेण्याचा निर्णय घेऊन त्यांच्यासाठी मोफत रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.
पाटील कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाची शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघासह करवीर तालुक्यात चर्चा जोर धरू लागली आहे. रुग्णवाहिका संपर्कासाठी गावोगावी कार्यकत्यांना नेमून त्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन अमृत उर्फ अमर पाटील शिंगणापूरकर यांनी केले आहे.