कोल्हापूर :
कोल्हापूर डाक विभागाने पोस्टमनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयातून UIDAI च्या CELCAPP व्दारे आधारला मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा सुरु केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून दि. 10 ते 12 ऑगस्ट या दरम्यान या मोहिमेव्दारे नागरिकांना घरपोच आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेव्दारे नागरिकांना घरपोच आधारला मोबाईल क्रमांक लिंक/ अपडेट करता येणार आहे. मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष/सेक्रेटरी सर्व रहिवाशांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस लिंकिंगसाठी त्याच्या पोस्टमनला भेटू शकतात व ह्या विशेष मोहिमेदरम्यान सर्वांचे आधार-मोबाईल लिंक करून घेवू शकतात. याबरोबरच इतर मोठ्या आस्थापना, कार्यालय प्रमुख देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे सर्वांचे आधार मोबाईल अपडेट करून घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमनशी संपर्क करू शकतात.
अधिक माहितीसाठी आयपीपीबीच्या www.ippbonline.com या संकेतस्थळ पहावे. सर्व नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफीसशी अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधून जास्तीत-जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांनी केले आहे.