आमशीत अँटिजेन तपासणीस प्रतिसाद
करवीर :
आमशी (या. करवीर) येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांचेकडून गावांमध्ये अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. या चाचणीला ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. गावामध्ये शंभर लोकांची चाचणी घेण्यात आली यामध्ये दोन महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव आला.
शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावांमध्ये अँटिजेन टेस्ट घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.आमशी गावात या चाचणीस नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज गावातील समाज मंदिरामध्ये शंभर लोकांची टेस्ट घेण्यात आली यामध्ये दोन महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना तात्काळ अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पुरुषाबरोबर महिलाही अँटिजेन चाचणी करून घेण्यात अग्रेसर दिसत होत्या.
यावेळी सरपंच उज्वला पाटील, उपसरपंच नामदेव पाटील, आरोग्य सेविका एस. एस. कुलकर्णी, टेक्निशियन पूजा खोले, आरोग्य सेविका एस.डी. सावंत, ग्रा. प. सदस्य बाजीराव कांबळे, रेश्मा लोखंडे, रामनाथ पाटील,अमोल लोखंडे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर आदीसह आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.