कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाहतुकीची कोंडी : पोलीसानी सुरू केली एकेरी वाहतूक
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे उसाचा ट्रॅक्टर आणि चार चाकी गाडी चा अपघात झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. पोलीसानी एकेरी वाहतूक सुरू केली आहे. दरम्यान अपघातामध्ये दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजते.

आज सकाळी बालिंगा महादेव मंदिराच्या समोर ओढ्यावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर गगनबावडा दिशेने जात होता, यावेळी कोल्हापूरला येणारी चार चाकी गाडीची समोरासमोर समोरासमोर धडक झाली. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे समजते, सकाळपासून अद्याप पोलीस यंत्रणांना न आल्यामुळे गगनबावडा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. तसेच अपघात स्थळी जागा रस्ता अरुंद असल्यामुळे एकेरी वाहतूक होत आहे.