सामाईक प्रवेश पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी
7 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा सन २०२२ करिता पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर तसेच मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती अशा सर्व सहा प्रशिक्षण केंद्रामध्ये विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 7 जानेवारी 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉ. लता जाधव यांनी केले आहे.
याबाबतची सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधीत इतर सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.