फोटो संग्रहित

कोल्हापूर :

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व इतर योजनांतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये दुधाळ जनावरांच्या (गाई-म्हशी) वाटप करण्यासाठी जिल्हानिहाय पॅनल तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जनावरे पुरवठादारांनी 8 सप्टेंबर पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे.

अर्जासाठीचे निकष-
• पुरवठादार व्यक्ती/संस्था/कंपनी/ फार्म यांच्याकडे कृषि उत्पन्न समितीचा जनावरांच्या बाजाराचा परवाना असणे अनिवार्य आहे.

• जनावरे खरेदी-विक्रीचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

• पुरवठादारास शासनाने मंजुर केलेल्या दराप्रमाणे दुधाळ जनावरांचा पुरवठा करावा लागेल. तथापि, लाभार्थी शेतकऱ्याच्या मागणीनुसार व खरेदी समितीने वाढीव किमतीचे दुधाळ जनावर खरेदी करावयाचे ठरविल्यास अधिकची रक्कम लाभार्थीकडून स्वतंत्ररित्या वसूल करावी लागेल.

• पुरवठादाराने पैदासीसाठी/दुध उत्पादनासाठी अयोग्य जनावरे (गाई-म्हशी) पुरवठा करण्याकरिता सादर करू नयेत. असे आढळून आल्यास करार रद्द करण्यात येईल व त्याचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.

• एखाद्या विभागाच्या/ जिल्ह्याच्या अधिकृत पुरवठादाराने पशुधनाचा विहित कालावधीत पुरवठा न केल्यास आणि अन्य विभागाचा / जिल्ह्याचा अधिकृत पुरवठेदार मंजुर दराने दुधाळ जनावरांचा (गाई-म्हशी) पुरवठा करण्यास तयार असतील तर त्यांच्याकडून खरेदी करण्यात येईल. याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही.

• प्रत्येक जिल्ह्यातील जनावरांच्या प्रचलित बाजारातून लाभधारकाच्या पसंतीने तसेच खरेदी समितीच्या उपस्थितीत दुधाळ जनावरांची खरेदी करण्यात येईल.

• पॅनलमध्ये सामाविष्ट असलेल्या अथवा पॅनलमध्ये सामाविष्ट करण्यासंदर्भात किंवा इतर कोणतेही वाद निर्माण झाल्यास त्याचा निपटारा प्रधान सचिव (पदुम),मंत्रालय ,मुंबई यांच्याकडे अपील करता येईल.

• अर्जदाराने सन २०१८-१९, सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ या कालावधीचे आयकर विवरण पत्र सादर करणे बंधनकारक.

• लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे वाटप करताना पुरवठादाराने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक राहिल, कोणत्याही प्रतिनिधीची नियुक्ती करता येणार नाही.

• अर्जदाराने पुरवठादार असल्याचे तसेच यापूर्वी किमान ३ वर्षे अशा प्रकारच्या खरेदी-विक्रीच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच मागील ३ वर्षामध्ये किती दुधाळ जनावरांची खरेदी केली याबाबतची कागदपत्रे सादर करावीत. त्याबाबत कृषि उत्पन्न बाजार समितीचे खरेदी-विक्रीचे अधिकृत आकडे सादर करावेत. दर वर्षी किमान २५ लाखांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केलेला असल्याचा दाखला.

• आवश्यकता पडल्यास इतर राज्यातून दुधाळ जनावरे आणण्याची व्यवस्था पुरवठादारास करावी लागेल, जेणेकरून पुरवठ्याची साखळी अबाधित राहील. त्याचा खर्च पुरवठादाराने स्वतः करायचा आहे.

• निवड करण्यात आलेल्या पुरवठादाराने विहित कालावधीत दुधाळ जनावरे उपलब्ध करून न दिल्यास पुरवठा आदेश दिल्याच्या दिनांकापासून १५ दिवसानंतर पुरावठादारास करारनाम्यामध्ये विहित केल्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

• केंद्र/राज्य शासनाचे सर्व संविधानिक कर अदा करण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहील.

• पुरवठादाराने दुधाळ जनावरांचा पुरवठा केल्यानंतर त्यांनी बाजार पावती किंवा देयक /ईनव्हाईस/ बील प्रिंटेड अधिकृत स्वरूपाचे असणे आवश्यक आहे .

आवश्यक बाबींची पूर्तता करणाऱ्या इच्छुकांनी ३० दिवसाच्या आत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे अर्ज करावेत. यासाठीचे अर्ज व करारनाम्याचा नमुना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, कोल्हापूर येथे उपलब्ध असल्याचेही, असेही डॉ. पठाण यांनी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!