करवीर :
करवीर तालुक्यातील
महे गावच्या ग्रामपंचायत संरपच पदी ज्येष्ठ नेते सज्जन तुकाराम पाटील यांची तर उपसरपंच पदी रुपाली युवराज बोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सज्जन पाटील यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे बिनविरोध सदस्य ते बिनविरोध सरपंच अशी पाटील यांची निवड झाली.

निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य एस. डी. जरग, हणमंत बाजीराव पाटील, शामराव आकाराम कुंभार, स्वप्नाली रामदास हुजरे, सुवर्णा सचिन पाटील, काजल सचिन बोराटे, सविता सुधाकर कांबळे यांच्यासह पांडुरंग शंकर पाटील, पंडीत सखाराम पाटील, सर्जराव दिनकर हुजरे, बाजीराव जरग, कृष्णात ठाणेकर, अॅड किरण नवाळे, रघुनाथ हुजरे, श्री कृष्ण पाणी पुरवठा चेअरमन बाबुराव पाटील,
अजित कांबळे, शहाजी वाईंगडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी अनिल गुरव , ग्रामसेवक स्वाती चव्हाण, तलाठी शुंभागी ठोगरे यांनी काम पाहिले. निवडीनंतर नूतन सरपंच , उपसरपंच यांच्या समर्थकांनी गुलाल लावून, फटाके वाजवून आंनद साजरा केला.