देशात १५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा,एकलव्य विद्यालयांमध्ये ३८,५०० शिक्षकांची नियुक्ती……

Tim Global :

Nirmala Sitharaman Speech Updates : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (बुधवार) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नवीन प्रोग्राम सुरू केले जातील.

शिक्षक प्रशिक्षक कार्यक्रमाव्यतिरिक्त देशात १५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नॅशनल डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत उघडल्या जातील. या ग्रंथालयांमध्ये प्रादेशिक भाषांमधील तसेच इंग्रजी भाषेतली पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. एनजीओंना सोबत घेऊन देशातल्या लोकांच्या साक्षरतेवर काम केलं जाईल.

एकलव्य विद्यालयांमध्ये ३८,५०० शिक्षकांची नियुक्ती……पुढील तीन वर्षांमध्ये एकलव्य विद्यालयांच्या माध्यमातून ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या शाळांमधून साडेतीन लाख आदिवासी मुलांना शिक्षण दिलं जाणार आहे.

२०२२ मध्ये शिक्षण क्षेत्राला काय मिळालं होतं?
२०२२ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला १ लाख ४ हजार २७७ कोटी रुपये जाहीर झाले होते. यामध्ये शालेय शिक्षणासाठी ६३,४४९ कोटी रुपये तर उच्च शिक्षणासाठी ४०,८२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सार्वभौमिक शिक्षणासाठी ३७,३८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!