जिल्ह्यातील घाट भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
कोल्हापूर :
भारतीय हवामान खात्याने आज व उद्या दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक आठ सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
या कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे नागरिकांनी लक्ष द्यावे व सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.
आपल्या गावात, परिसरात अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाह्य मदतीची गरज असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.