कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक कार्यक्रमनुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इच्छुक उमेदवारांनी निवडणूक अधिकारी व करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे अर्ज दाखल केले.
पहिल्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक विश्वास पाटील आबाजी व अरुणकुमार डोंगळे, संचालक बाळासाहेब खाडे या विद्यमान संचालकांचा तसेच कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, माजी संचालक बाबासाहेब चौगले यांचा समावेश आहे.
विश्वास पाटील आबाजी यांनी ४, अरुणकुमार डोंगळे , बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील, अजित नरके यांनी प्रत्येकी १, बाबासाहेब चौगले यांनी २, महाबळेश्वर चौगले यांनी २ असे सात जणांनी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.