इयत्ता बारावी व दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यास मुदतवाढ
कोल्हापूर. :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये होणाच्या इ. १२ वी व १० वी परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नं.१७) ऑनलाईन प्रकियेव्दारे नियमित शुल्काने भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
त्यासाठी नमुद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे. १२वी व १०वी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या मुदतवाढीबाबतच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
बुधवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ ते बुधवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ -विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे.
गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ ते गुरुवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ -विद्यार्थ्यांना मूळ अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे,
मंगळवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२1 -संपर्क केंद्र शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे.
शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा. कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इ.१० वी इ.१२वी २०२१ चा निकाल जुलै-ऑगस्ट मध्ये लागलेला असल्याने, खासगी विद्यार्थी ऑनलाईन नाव नोंदणीबाबत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा/कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ अशी ग्रा्हय धरण्यात यावी. हा बदल कोविड-१९ मुळे फक्त सन २०२२ च्या परीक्षेपुरताच लागू राहील. तथापी विद्यार्थ्यांच्या वयासाठी दि. ३१ जुलै अशी तारीख राहील.
खासगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व 12 वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचा ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील बेवसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीमधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
संकेतस्थळ- इ.१० वी http://form17.mh-ssc.ac.in व
इ. १२ वी http://form17.mh-hsc.ac.in
दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांना त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायापत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/ कनिष्ठ महाविद्यालय/ संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.
ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२०-२५७०५२०७/२५७०५२०८/२५७०५२७१ वर संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र/ कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी.
पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.