सडोली खालसा येथे रा. बा. पाटील विद्यालयात कर्मवीरांना अभिवादन
करवीर :
रयत शिक्षण संस्था संचलित रा. बा. पाटील विद्यालय सडोली खालसा येथे थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, माजी आमदार संपतराव पवार -पाटील (बापू ) हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमासाठी राणी बाळासाहेब पाटील ह्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे -वक्ते, मान्यवर तसेच दहावी परीक्षेत उज्वल यश मिळवलेले विद्यार्थी व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल एस. बी. कुरणे यांचा संपतबापू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात कुरणे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. विद्यार्थी मनोगतामध्ये कु.कार्तिकी सडोलीकर हिने सादर केलेल्या “आभाळा एवढं मन” या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी वक्त्या राणी पाटील म्हणाल्या, कर्मवीर आण्णानी ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवून बहुजन समाजातील लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यासाठी दीपस्तंभ आहे.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार संपतबापू म्हणाले, कर्मवीरांनी शिक्षणाबरोबर समाजातील जातीय विषमता नष्ट केली. कर्मवीरांचे शैक्षणिक योगदान चिरकाल स्मरणात राहणारे आहे.
कार्यक्रमास स्कुल कमिटी सदस्य बाळासाहेब साळोखे, उदयसिंह पवार -पाटील, एम. डी. निचिते, शिक्षणप्रेमी एस. एस. पाटील, विलास पाटील, विश्वास आत्तीग्रे, ए. पी.खराडेसर, पवन पाटील, साळोखे सर,आनंदा मोरे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. व्ही. एम. देवळकर यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. व्ही. शिंदे यांनी मानले.