यास चक्रीवादळ : आठ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता : महाराष्ट्रालाही बसणार फटका

मुंबई :

ओडिशा, पश्चिम बंगालला यास चक्रीवादळाने  झोडपून काढले,आता  यास चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. (Maharashtra will also be hit by yaas ). कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. त्याचा प्रभाव हा शेजारच्या चार राज्यांवर जाणवणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.यास चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात येत्या २४ तासांत पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो.

यास चक्रिवादळ ओडिशातून, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, झारखंडच्या सीमेत वादळाने प्रवेश केला असून चक्री वादळाची गती कमी झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. छत्तीसगडलगतच्या गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये यासचा सौम्य प्रभाव पडू शकतो. या भागात तासी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!