जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
कोल्हापूर :
कोव्हिड प्रतिबंधासाठी राज्य शासनाने 15/05/2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पासून ते दिनांक 01/06/2021 रोजीच्या सकाळी 07.00 वा. पर्यंत प्रतिबंधात्मक आदेशास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच अतिरिक्त निर्बधांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. दिनांक 13 मे रोजी काढलेल्या आदेशा मध्ये जिल्हाधिकार दौलत देसाई यांनी खालील प्रमाणे सुधारित आदेश यांनी दिले.

“माल वाहतुक करणाऱ्या वाहनामधून 2 पेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना (चालक + क्लिनर / हेल्पर) प्रवास करण्यास परवानगी राहील. जर असे माल वाहतुक करणारी वाहने बाहरेच्या राज्यामधून येत असतील, तर अशा वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या वेळेच्या 48 तास अगोदर देणेत आलेली RTPCR -Ve चाचणी असलेला अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात येत आहे. सदर अहवाल हा 7 दिवसापर्यंत वैध असेल या ऐवजी.
“माल वाहतुक करणाऱ्या वाहनामधून 2 पेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना (चालक + क्लिनर / हेल्पर) किंवा लांब अंतराच्या आणि आपत्कालीन मालवाहतूक करणाऱ्या वाहनामधुन 3 पेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना (2 चालक + क्लिनर | हेल्पर) प्रवास करण्यास परवानगी असेल. जर अशी मालवाहतूक करणारी वाहने बाहेरच्या राज्यामधून येत असतील तर अशा वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यावेळी त्याचे शरीराचे तापमान तपासणी आणि इतर लक्षणे तपासणे तसेच आरोग्य सेतू अॅप वरील स्थिती तपासणे.
जर तपासणीमध्ये एखाद्या व्यक्तीला लक्षणे आढळल्यास अथवा आरोग्य सेतू अॅप द्वारे एखादी व्यक्ती सुरक्षित नसल्यास, अशा सर्व व्यक्तींना जवळच्या कोविड केअर सेंटर (ccc) मध्ये पुढील तपासणीकरिता पाठविणे बंधनकारक असेल. असे वाचावे, असे आदेश नमुद केले आहे.