ग्रामविकासासाठी संवाद : ग्रामीण भागात कार्यरत कार्यकर्त्यांची एकदिवशीय कार्यशाळा, गुरुवार, दि. १६ रोजी आयोजन.
कोल्हापूर :
पर्यावरण,आरोग्य, कृषी,तंत्रज्ञान, शिक्षण, ऊर्जा याबाबत समाजात जाणीव- जागृती निर्माण करणे,बदलत्या काळानुसार ग्रामीण विकासासमोरील आव्हाने आणि समस्या याबाबत सकारात्मक चर्चा करणे. हा उद्देश समोर ठेवून, ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची एक दिवशीय कार्यशाळा
‘ आमचा गाव, आमचा विकास मीडिया’ आणि ‘शाश्वत फाउंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक प्रभाकर पाटील यांनी दिली.
कोल्हापूर येथील सायबर कॉलेज, डी.के. शिंदे समाजकार्य विभाग येथे गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी दुपारी १२:०० ते ३:०० या वेळेत ही कार्यशाळा होत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांचा उद्देश हा ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा आणणे, त्यांना रोजगार मिळवून देणे आणि त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा पुरवठा करणे हा आहे. मात्र ह्या योजनांची अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण होतात का ? किंवा एखादी योजना राबवत असताना स्थानिक परिस्थिती,प्रशासकीय स्तरावर, सामाजिक बाबींमुळे ती योजना राबवताना प्रत्येक गावाच्या स्थितीनुसार काही समस्या निर्माण होतात का ? ही या कार्यशाळेची मध्यवर्ती कल्पना आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा , रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ग्रामीण विकासामध्ये काम करणारे मान्यवर लोकांना आम्ही आमंत्रित केले आहे. तसेच ग्रामीण विकासामध्येच सातत्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करत आलेले तज्ञ यांनाही आम्ही मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलेले आहे. या कार्यक्रमासाठी आपण प्रायोजकत्व स्वीकारावं आणि या ग्रामविकासाच्या चळवळीमध्ये आपणही सहभागी व्हावे, असे आवाहनहही प्रभाकर पाटील (9158185300) यांनी केले आहे.
कार्यशाळेस खालील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन व आपले विचार मांडून सहभागी सर्वाशी संवाद साधणार आहेत.
मा.प्राचार्य अर्जुन आबिटकर
प्राचार्य ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर गारगोटी
मा.जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर
मा. जितेंद्रराजे ज्ञानू भोसले
प्रदेशाध्यक्ष: सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य तथा प्रथम मा.लोकनियुक्त सरपंच नागझरी
अधिष्ठाता. डॉ. सोनिया रजपूत
अधिष्ठाता. डी.के.शिंदे समाजकार्य विभाग ,
सायबर कॉलेज कोल्हापूर
मा.राणीताई पाटील
अध्यक्षा : महिला सरपंच आघाडी महाराष्ट्र
मा.सागर माने
मा. लोकनियुक्त सरपंच जाखले तालुका पन्हाळा
युवा उद्योजक
मा.निलेश व्यवहारे
युवा उद्योजग आणि पाणी फाउंडेशन समन्वयक
मा.शिवाजीराव मोरे (आप्पा)
मा. जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर
प्रा. डॉ. दुर्गेश वळवी डी.के. शिंदे समाजकार्य विभाग, सायबर इन्स्टिट्यूट, कोल्हापूर.
—————————————————————