अंबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. संजीवनीदेवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडी रौप्यमहोत्सवी समारंभ उत्साहात
पन्हाळा :
ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे दोन पिढ्यांचे भरुन न येणारे नुकसान झाले आहे . असे मत आमदार डॉ.विनय कोरे यांनी व्यक्त केले . शिदेवाडी ( ता. पन्हाळा ) येथील श्री अंबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ . संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडीच्या रौप्य महोत्सवी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुंभी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जी .डी. पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी अटल टिक रिंग लॅबचे उद्घाटन आमदार डॉ. कोरे , शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माध्य . शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते झाले. तसेच जेष्ठ नागरिक व कोविड योद्धांचा सत्कार झाला. को . जि . मा . शि . चे तज्ञ संचालक दादासाहेब लाड , मुख्याध्यापक पोपटराव पाटील, सुरेश संकपाळ, एकनाथ आंबोकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमास गजानन विभूते, प्रकाश पाटील , दगडु पाटील , सरपंच शिवाजी पाटील, सिंधुताई शिंदे, एस .के. पाटील , अजित रणदिवे , श्रीकांत पाटील, पी.एस् .पाटील व सर्व संघाचे पदाधिकारी तसेच सोलापूरहून आलेले शिक्षक नेते आण्णा गायकवाड, कृष्णराव बहिरे , आनंदा मासाळ , मार्तंड सर आदींची उपस्थिती होती.