करवीर :
आता निवडणूक संपली, ही आणि भानामती कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे फाटा येथे मोठ्या प्रमाणात भानामती केल्याची घटना घडली आहे.याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे, दिवसेंदिवस परिसरात अंधश्रद्धा वाढत असून या प्रकाराबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यावेळी अनेक ठिकाणी भानामती झाल्या.मात्र आता निवडणुका नाहीत,मात्र या ठिकाणी भानामती करण्यात आली आहे.ही भानामती कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाकरे फाटा येथे एका झाडाखाली खिळ्या मध्ये पाच,पाच लिंबू मारून हे खिळे जमिनीत मारण्यात आले आहेत.
या मार्गावर हॉटेल्स, फळाचे गाडे,व विविध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.यातून हा प्रकार झाला असावा अशी चर्चा घटनास्थळी होती.
सरदार माने वाकरे
प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी असा भानामातीचा प्रकार केला जातो.कोंबडा कापला जातो, ही अंधश्रद्धा आहे. येथील शेतकऱ्यांच्या तुंन तीव्र संताप व्यक्त होत आहे.