करवीर :
जिल्हापरिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखाना खुपिरे श्रेणी-1 यांच्यावतीने दोनवडे ता. करवीर येथे जनावरांसाठी वंधत्व निवारण शिबिर घेण्यात आले. यावेळी सुमारे ५५ जनावरांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.
कामधेनु दत्तक ग्राम योजनेअंतर्गत वंधत्व निवारण व गोचीड फवारणी शिबिर आयोजित केले. शिबिराचे उद्घाटन सरपंच सारिका जाधव, सर्व सदस्य ग्रामसेवक संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
ग्रामपंचायतीच्या वतीने गेली दोन दिवस शिबिरासाठी दवंडी देण्यात आली.यामुळे शेतकरी जनावरे तपासणीसाठी घेऊन आले.
पशुधन विकास अधिकारी डॉ. पी.एम गायकवाड यांनी जनावरांची तपासणी केली.यावेळी वरनोपचार तज्ञ सी. आर. पाटील, परिचर महेश शिंदे, रघुनाथ शिरगावकर, यांनी काम पाहिले. ग्रामपंचायतीच्या वतीने संभाजी नलवडे, आनंदा कांबळे यांनी सहकार्य केले.
यावेळी जनावरांची तपासणी करून औषधे देण्यात आली. सकाळी ८ ते दुपारी एक वाजेपर्यंत शिबिर पार पडले.