करवीर :
करवीर तालुक्यात कोरोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक गावे हा हॉटस्पॉट बनली आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वेळीच रोखण्यासाठी हॉटस्पॉट
गावांमध्ये अँटीजन टेस्ट तात्काळ सुरू करावी अशी मागणी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली.
करवीर तालुक्यातील मोरेवाडी, पाचगाव ,आमशी, निगवे दुमाला वडणगे , उचगाव , पाडळी खुर्द याठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अशा गावांत अँटीजन टेस्ट करून सुपर स्प्रेडर असणारे भाजीविक्रेते, धान्य दुकानदार , दूध विक्रेते, फळ, भाजीपाला विक्री करणारे, दूध संस्थेचे कर्मचारी, गिरणी कामगार, ज्यांचा संपर्क जास्त लोकांशी येतो यांची प्रत्येक गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष चाचणी करावी. याबद्दल चाचणी करणेबाबत प्रांत अधिकारी यांच्याशी नुकतीच चर्चा झाली
आहे.
तालुक्यातील शिंगणापूर कोव्हिड सेंटर पूर्ण भरले आहे . रुगणांची वाढती संख्या पाहता प्रत्येक गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करावा की काय असे चित्र आहे. रुग्ण असलेल्या गावात विलगीकरण कक्ष सुरू करून टेस्ट घ्यावी घेण्याची गरज आहे. मागील कोरोनाच्या पहिल्या लाटेत आय.टी.आय कॉलेज याठिकाणी स्वँब तपासणी केली जात होती, त्याच पद्धतीने शिंगणापूर कोव्हिड केंद्र या ठिकाणी स्वँब तपासणी केंद्र
चालू करावे.
रुग्णसंख्या वाढत अशीच वाढत गेल्यास डी.सी.नरके विद्यानिकेतन केंद्र व कुरुकली कोव्हिड केंद्र सुरु करण्यासाठी प्रशासनाने सज्ज व्हावे.
गाववार ग्राम समिती स्थापन आहेत त्या पुन्हा कार्यरत व्हाव्यात आणि कोरोना थोपविण्यासाठी ग्रामस्थांनी शासकीय नियमांचे पालन करून प्रशासनाला , ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही सूर्यवंशी यांनी केले.