करवीर :
गोकुळ मध्ये आमदार
.पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी द्यावी,राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार रणजित पाटील यांनी केले.

साबळेवाडी (ता.करवीर) येथील काँग्रेसचे एकनिष्ठ नेते, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै. बाजीराव मारुती पाटील (बी.एम.) यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना गोकुळ निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीतून उमेदवारी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर साबळेवाडी येथे शाहू सहकार समूहाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ,
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृष्णात पाटील होते.
यावेळी रणजित पाटील म्हणाले, गेली ३० वर्षे आमच्या वडिलांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काम केले आहे. शाहू सहकार समूहाच्या माध्यमातून सहकार उत्कृष्ट पध्दतीने चालवला आहे. त्यांचा वारसा घेऊनच आपणही सहकारात चांगले काम करत आहे. याची दखल घेऊन जिल्ह्याचे नेते आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी सत्ताधारी गटातून गोकुळ निकडणुकीसाठी माझ्यासारख्या तरुण उमेदवाराला संधी दिली आहे. नेत्यांच्या, सभासदांच्या, दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र राहून कार्य करण्यासाठी राजर्षी शाहू आघाडीला पूर्ण ताकदीने निवडून द्यावे.
कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील व माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले, आमदार पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ अत्यंत चांगल्या पध्दतीने चालू आहे. दर दहा दिवसाला दूध बिल देणारा देशातील एकमेव संघ आहे. कोरोना काळात सर्वत्र भयाण परिस्थिती असताना कठीण काळात केवळ आणि केवळ गोकुळ दूध संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तारले आहे. गोकुळ चांगलाच चालला असून गोकुळमध्ये सत्ताधारीच सत्तेत यावेत अशी जनमानसात व ठरावधारकांत भावना आहे.
यावेळी सरदार बंगे म्हणाले, वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघात व खुपिरे पंचक्रोशीत रणजित पाटील यांच्या रूपाने गोकुळसारख्या देशातील नामवंत संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याबद्दल आमदार पी.एन.पाटील यांचे आभारी आहोत. रणजित पाटील यांचे सहकारात चांगले कार्य असल्याने साबळेवाडी, खुपिरे परिसरातील ठरावधारक राजर्षी शाहू आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत आडनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार परिषदेस जी.डी.पाटील, उत्तम पाटील, माजी सरपंच प्रकाश चौगले, दिलीप पाटील, राजू पाटील, धनाजी पाटील, प्रभाकर पाटील, शहाजी नाईक, सतीश चौगले, भिकाजी पाटील, दत्तात्रय टेकावले, सागर बाजीराव पाटील, सागर पाटील, नाना पाटील आदी उपस्थित होते.