करवीर :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरणासाठी आरोग्य विभागातील कोरोना योद्धे प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. कसबा बीड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य सेविका, डाॅक्टर, आशा वर्कर्स कोरोना योद्धयांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप करणेत आले.
याप्रसंगी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती मां.राजेंद्र सूर्यवंशी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूरचे जिल्हा उपअध्यक्ष जगदीश पाटील महेकर, एकनाथ दुर्गुळे, ,डॉक्टर, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक आदी उपस्थित होते.