करवीर :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता
हळदी (ता.करवीर ) येथे कोरोना लसीकरणास
सुरुवात करण्यात आली. कोरोना लस देण्याचा प्रारंभ सरपंच सौ. विमल बाळासो सुतार, उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील यांच्या हस्ते तसेच भाजपचे करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा प्रताप पाटील, प्रशांत कांबळे,सर्जेराव पाटील, आनंदा लंबे, प्रदीप पाटील प्रताप पाटील, राजेंद्र बन्ने व हसुर दुमालाआरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित पोळ, डॉ. एन. ए लोखंडे, एम.एम.भाट आरोग्यसेवक , एस.एन. देसाई, आरोग्य सेवक , आरोग्य सेविका व सर्व आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.