करवीर :
कुंभी कासारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. डी. सी.नरके यांना ११० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्यास मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित पुष्पहार अर्पण केला.
यावेळी अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले स्व डी सी नरके यांनी नेहमी शेतकरी सभासदांचा विचार समोर ठेवून कुंभी कासारीची वाटचाल सुरू ठेवली होती. त्यांचेच विचार नरके कुटुंबिय समोर ठेवून सहकारात काम करत आहेत.
यावेळी संचालक पि.के. पाटील, जयसिंग पाटील (यवलुज). दादासो लाड, कार्यकारी संचालक अशोक पाटील ,सेक्रेटरी प्रशांत पाटील, सुरक्षा अधिकारी बबन पाटील, कामगार प्रतिनिधी विलास गुरव, सीडीओ तानाजी पवार, रमेश तळसकर, इलेक्ट्रिक इंजिनिअर तरकसबंद, बी. एम.पाटील, सागर पाटील, उमाजी शिरगावकर, संभाजी इंजुळकर उपस्थित होते.