नदी घाटावर अंथरूण धुणाऱ्यावर कारवाई
करवीर :

शिंगणापूर नदी घाटावर कपडे व अंथरूण धुण्यासाठी आलेल्या लोकांना पकडून पोलिसी खाक्या दाखवत ग्रामपंचायतीने पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाई
केली. अशी कारवाई करणारी शिंगणापूर ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, पंचगंगा या दोन नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित आहेत. ग्रामीण भागातून वाहणाऱ्या नद्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे,कपडे व अंथरूण धुतली जातात, तर शेतकरी किटकनाशक तणनाशक मारून झाल्यानंतर पंप थेट नदीत स्वच्छ करतात. तसेच अनेक गावांचे सांड पाणी प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात मिसळत आहे. या शिवाय औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया न करता सांड पाणी सोडले जाते.काही साखर कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत असते,
या सर्व गोष्टींमुळे नदी प्रदूषणात मोठी भर पडत असते.
शिंगणापूर लोकनियुक्त सरपंच प्रकाश रोटे यांनी नदी घाटावर कपडे व अंथरूण धुण्यासाठी आलेल्या लोकांना पकडून, पोलिसाकरवी दंडात्मक कारवाई केली.यावेळी घाटावर आलेल्या लोकांची पळताभुई थोडी झाली.कपडे व अंथरूण धुवून नदी प्रदूषणात भर घालणाऱ्यावर लोकांवर कारवाई करण्याची ही बहुधा जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे .
यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदिप कोळेकर, सुभाष कांबळे, सदस्य महेश पाटील व कर्मचारी यांनी कारवाईत भाग घेतला.या लोकांच्या कडून आठ हजार दंड वसूल करण्यात आला आहे
प्रकाश रोटे ,लोकनियुक्त
सरपंच शिंगणापूर,
शिंगणापूर नदी घाटावर दररोज शेकडो लोक कपडे अंथरूण धुण्याबरोबरन जनावरे धूतात यातून नदी पाणी प्रदूषण होत आहे, हेच पाणी सर्व गावासाठी पीण्यासाठी वापरले जाते. हे थांबले पाहिजे म्हणून कारवाई केली.